Home अमरावती मराठा तेली समाज वधुवर परीचय पुस्तक ‘बंध नात्यांचे’ विमोचन

मराठा तेली समाज वधुवर परीचय पुस्तक ‘बंध नात्यांचे’ विमोचन

334
0

समाजाने एकञ येवुन मोठ्या प्रमाणात समाजासाठी कार्य करावे – माजी पालकमंञी जगदीशभाऊ गुप्ता
अमरावती प्रजामंच,०९/०१/२०२२
स्थानिक बडनेरा रोड स्थित जयभारत मंगल कार्यालयात मराठा ,देशकर , तिळवन, लिगांयत, तेली समाजाच्या “बंध नात्याचे” या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रामुख्याने उदघाटक म्हणून माजी पालकमंत्री जगदीशभाऊ गुप्ता, कार्यक्रमाचे समाज संघटनेचे अध्यक्ष चद्रकांत मेहरे, प्रा.डॉ.सजंयभाऊ तिरथकर, उपाध्यक्ष गजानन बाखडे, सचिव संजय रायकर,कोषाध्यक्ष यंशवत चतुर, रविन्द्र बाभुळकर,वसंतराव बाखडे,संजय तायवाडे व प्रमुख अतिथी म्हणुन माजी महापौर अशोकराव डोंगरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी जगदीशभाऊ गुप्ता यांनी आपल्या भाषणामध्ये बंध नात्यांचे या पुस्तकाचे कौतुक केले, आजच्या बदलत्या युगामध्ये, एकाच वेळी अनेक वधुवर परीचय मेळावे होत असल्याने त्यामुळे पैसा,अमुल्य वेळ वाचतो, तसेच वधुवर शोधतांना होणाऱ्या अडचणी दुर होतात ही एक संधी मराठा तेली समाज विकास मंडळ आपल्याला दरवर्षी उपलब्ध करुन देते , ही एक कौतुकास्पद बाब आहे त्यामुळे पालकांना योग्य वधु-वर शोधण्यास मदत होते.
तसेच माजी महापौर अशोकराव डोंगरे यांनी आपल्या भाषणात सुद्धा पुस्तकाचे कौतुक केले, आणि आजच्या युगामध्ये,समाजाची पुस्तके, मेळावे, सामुहिक विवाह सोहळा होणे आजच्या काळाची गरज आहे, असे हि सांगितले.
कार्यक्रमाची सुरवात सतांजी जगनाडे महाराजांच्या आरतीने करून पोलीस खात्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अशोकभाऊ मांगलेकर यांचा सत्कार तेली समाजाकडून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मडंळाचे सचिव संजय रायकर, सुञ संचालन प्रा.स्वप्निल खेडकर, तसेच आभार प्रदर्शन पंकज माहुरे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मा.श्री चद्रकांत मेहरे ,प्रा.डॉ.सजंयभाऊ तिरथकर ,गजानन बाखडे,संजय रायकर , नितीन बाखडे , यशवंत चतुर .अशोक मांगलेकर ,दिपक व्यवहारे, प्रा.स्वप्निल खेडकर ,प्रकाश तिडके, पकंज माहुरे,रमेश बोके,उल्हास ताकपिरे ,तुषार गिरमकर,राजु काळे,पकंज डाहाके ,चेतन सरोदे, अशोक देशकर, रविन्द्र बाभुळकर , वसंतराव बाखडे ,विठोबा मेहरे, संजय तायवाडे, बबन बाखडे, श्याम पाटील, राजेंद्र चांडोळे, श्रीकांत भनंग ,धिरज मानमोडे सह युवा आघाडी व कार्यकर्ते व समाज बांधव यांचे सहकार्य लाभले.