Home अमरावती संवैधानिक पदाचा अपमान करणाऱ्या धारणी येथील तहसीलदार अतुल पटोले यांना निलबिंत करा...

संवैधानिक पदाचा अपमान करणाऱ्या धारणी येथील तहसीलदार अतुल पटोले यांना निलबिंत करा -दुर्गाताई बिसंदरे

1386
0

धारणी प्रजामंच १७/०९/२०२१
धारणी येथील तहसीलदार अतुल पटोले यांची वर्तणुक नागरिकांसोबत चांगली नाही, अश्या अधिकाऱ्यांचा मनोपचार तज्ञ डॉक्टर कडून तपासणी करण्यात यावी असा आरोप धारणी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष दुर्गाताई प्रभुदास बिसंदरे यांनी केला असून तशी लेखी तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे मार्फत केली आहे.
अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या मेळघाटातील धारणी तालुक्याचे तहसीलदार अतुल पटोले हे दुर्गम भागातील नागरिकांना अतिशय अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या अनेक तक्रारी माझ्या या अगोदर आल्यात तर अवैध खनिज उत्खनन करण्यांना पाठीशी घालून मोठ्या सम्मानाने खुर्चीवर बसवितात.असे अनेकांनी सांगितले याचा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा स्वस्त धान्य दुकानदाराकडून गरीब आणि पिडीत महिलांना न्याय मिळावा म्हणून त्याच्या दालनात घेवून गेले असता त्या महिला व महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य या संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीसोबत अतिशय उध्दट आणि अपमानास्पद बोलेले, जी बाब तहसीलदार या पदला न शोभणारी आहे. अश्या उध्दटपणाने वागणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे सामान्य जनता आपले प्रश्न कसे यांच्या कडे मांडणार? तहसीलदार अतुल पटोले यांच्या कार्यकाळात धारणी मध्ये अनेक बोगस कामे झाले आहे, त्यामळे यांची तत्काळ खाते चौकशी व्हावी व नागरिकांशी गैरवर्तणूक व उध्दट वागण्या प्रकरणी शिस्त भंगाची कार्यवाही करून तत्काळ निलंबित करावे असे लेखी निवेदनात महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष दुर्गाताई प्रभुदास बिसंदरे यांनी नमूद केले आहे.

महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही याविषयी तत्काळ मंत्रालयाशी मी दूरध्वनी व्दारे संपर्क केला असून लेखी निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठविले आहे. कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे.
संगीताताई ठाकरे जिल्हा अध्यक्ष महिला राष्ट्रवादी कॉग्रेस अमरावती