Home अमरावती दिया गाव शंभर टक्के लसीकरण सांघीक सहकार्याने शक्य झाले-सरपंच निशा भिलावेकर

दिया गाव शंभर टक्के लसीकरण सांघीक सहकार्याने शक्य झाले-सरपंच निशा भिलावेकर

360
0

मेळघाटातील दिया गाव शंभर टक्के लसीकरण झालेले पहिले गाव,लोकप्रतिनिधींचे १०० टक्के लसीकरण.

संपूर्ण ग्राम पंचायत लसीकरण करण्याचे लक्ष, एका दिवसात १८० लोकांचे लसीकरण  

धारणी प्रजामंच,18/06/2021

मेळघाट सारख्या अति दुर्गम भागात कोरोना लसी विषयी पसरलेल्या गैरसमजमुळे नागरिकांनी पाठ फिरविल्याची परिस्थिती असताना मेळघाटातील सर्वाधिक मोठी असणारी दिया ग्राम पंचायतने कोरोना लसीकारणात आघाडी घेतली असून दिया गावातील ४५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण करून अग्र स्थानी असल्याचा झेंडा रोवला आहे.

दिया ग्राम पंचायत मध्ये दिया,तलाई,तलाई कॅम्प,टाकरखेडा,उतावली या गावांचा समावेश असून ग्राम पंचायत मधील वयाच्या ४५ वर्षेवरील लाभार्थ्यांचे ५० टक्के लसीकरण झाले असून दिया गावाचे १०० टक्के झाले आहे, सर्व ग्राम पंचायत लोकप्रतिनिधीनी सुध्दा लस घेतली आहे. ग्राम पंचायत सरपंच व सदस्य यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्थापन करण्यात आलेले टास्क फोर्स यांचे मोठे योगदान या कार्यात होते, दिया गावात एकूण पात्र लाभार्थ्यांची संख्या ४०१ असून त्यापैकी ३४० लोकांचे लसीकरण झाले आहे तर ६१ लोकांना काही आरोग्य विषयक समस्यामुळे देता आले नाही, दिया येथे दोन वेळा कोरोना लसीकरणाचे कॅम्प घेण्यात आले प्रथम वेळी ८६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यामध्ये ६४ लाभार्थी दिया गावातील होते तर इतर २२ ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील होते, दुसऱ्या वेळेच्या लसीकरण कॅम्प मध्ये एकूण १८० लोकांना लस देण्यात आले त्यापैकी १७६ लाभार्थी दिया येथील तर ४ ग्राम पंचायत अंर्तगत गावातील होते. यावेळी सरपंच निशा भिलावेकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, एवढ्या मोठ्या गावात शंभर टक्के लसीकरणचे लक्ष गाठणे एवढे सोपे नाही. मात्र गावातील, सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व ग्राम पंचायत सदस्य, प्रतिष्टीत नागरिक,पोलीस पाटील आरोग्य विभाग या सर्वांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे शंभर टक्के लसीकरण करण्याचा टप्पा गाठला. ग्राम मधील इतर गावात ५० टक्के लसीकरण झाले आहे ते लवकरच कॅम्प घेवून १०० करण्याचा प्रयत्न आहे असे हि सरपंचा म्हणाल्या.

लसीकरण मोहीम राबवीत असतांना उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मित्ताली सेठी यांचे विशेष मार्गदशन होते, दिया येथील कॅम्पला जिल्हाधिकारी शैलेश नैवाल यांनी प्रत्यक्ष भेट देवून सर्व लसीकरण करून घेण्यासाठी श्रम घेणारया पदाधिकारी व प्रतिष्टीत नागरिकांचे स्वागत केले. तहसीलदार अतुल पटोले यांचे हि योगदान मिळाले.

या लसीकरण मोहिमेत जिल्हा परिषद सदस्य माया मालवीय, पंचायत समिती सदस्य बाबुलाल मावस्कर, उपसरपंच सावित्री जैस्वाल, ग्राम पंचायत सदस्य दुर्गाताई बिसंदरे,रामकिसन मावस्कर, रविराज कास्देकर,सारिका पटेल,दिनेश कोचलकर,नेकलाई मालवीय,रामसिंग जावरकर,मंजू जावरकर,संदीप गावंडे,शोभा कासदेकर,बिहारी धुर्वे, प्रतिष्ठित नागरिक कालू उर्फ शैलेश मालवीय, कपिल जैस्वाल, तालुका वैद्यकीय अधिकारी नवलाखे, तलाठी तायडे, पोलीस पाटील विजय मावस्कर,परिचारिका नागनपुरे, अंगणवाडी सेविका लता चावलकर, आशा सेविका जयवंती जांबेकर,कोबलाई मावस्कर, जयराम  मावस्कर, रितेश मालवीय,चंपालाल जावरकर,आकाश जावरकर, पवन जावरकर, मनीष चिलाटीकर,मनोज मावस्कर, सरला बनसोड,आशा बनसोड, रजनी जावरकर,भूमिका कोचलकर, भुरीबाई मोरशे, शुभद्रा जावरकर,बाटु जावकर यांनी सहभागी होवून श्रम घेतले म्हणून दिया गाव शंभर टक्के लसीकरण करणे शक्य झाले.लसीकरणाच्या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी आर. एच रामागडे यांचे सहकार्य लाभले.