Home अकोला अखेर धारणीचे वादग्रस्त तहसीलदार अतुल पटोळे यांची बदली

अखेर धारणीचे वादग्रस्त तहसीलदार अतुल पटोळे यांची बदली

1017
0

धारणी प्रजामंच,२१/०९/२०२१
धारणी येथील तहसीलदार अतुल पटोळे यांची धारणी येथून बदली खामगाव येथे करण्यात आली आहे. सतत वादात राहणारे धारणीचे पहिले तहसीलदार ठरले, तहसीदार पदाचा गर्व बाळगून उद्धटपणाने वागणाऱ्या अतुल पटोळे यांची तक्रार महिला तालुका अध्यक्ष दुर्गाताई बिसंदरे यांनी थेट उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्याकडे लेखी तक्रार करून दूरध्वनी व्दारे संपर्क साधला होता. जनतेसोबत असभ्यपणे वागत असल्याची सतत ओरड आदिवासी भागात ऐकायला मिळत होती, त्या बाबीला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा आता चर्चिली जात आहे.अतुल पाटोळे धारणी तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना अवैध गौण उत्खनन व इतर बाबीला विशेष प्रोत्साहन मिळत असल्याची ओरड होत होती, धारणी तहसील कार्यालय जप्त केलेल्या वाळू पासून बांधकाम करणे, गरिबांच्या पकडलेल्या रेतीचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी दंडाची रक्कम नगदी वसूल करणे दुसरीकडे धनाढय लोकांचे ट्रक धनादेश घेऊन सोडणे, कोतवाल पासून तहसील कार्यालयापर्यत साखळीने अवैध गौण उत्खननाला सहकार्य करण्याचा आरोप, न्याय देण्यामध्ये असमानता आदी साठी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने वृत्तपत्रांत धारणी तहसील झळकत दिसायचे,मात्र आता सर्व या गोष्टीला पूर्णविराम मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. तहसीलदार अतुल पटोळे यांचे नवीन कार्यक्षेत्र खामगाव राहणार आहे.
तहसीलदार अतुल पाटोळे यांची बदली झाली असली तरी  अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून धारणी येथील कार्यकाळाची विभागीय चौकशीसाठी मागणी करणार आहे.
सौ. दुर्गाताई प्रभुदास बिसंदरे तालुका अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस धारणी.