Home अमरावती गर्भपात गुन्हा असेल तर अठरा वर्षाच्या आतील मुले मोबदलापासून वंचित का ?-...

गर्भपात गुन्हा असेल तर अठरा वर्षाच्या आतील मुले मोबदलापासून वंचित का ?- मन्नालाल दारसिंबे

608
0

दारू – मटणासाठी स्वाभिमान विकू नका
७५ वर्षात मूलभूत सुविधा न देणाऱ्या नेत्यांकडे भीक मागणे एक लाचारी
मेळघाटात विविध ठिकाणी क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा जयंती साजरी
धारणी प्रजामंच,23/11/2021
मेळघाट हे आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळखले जाते अनेक वर्षांपासून मेळघाटातील आदिवासी यांच्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आपली माय ही धारणा कायम होती ती आता पुसट होत क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे, यावरून मेळघाटातील आदिवासीमध्ये जागृती येऊन विकासाकडे वाटचाल असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र जनक्रांती सेनाचे संस्थापक व अध्यक्ष मन्नालाल दारसिंबे यांच्या नेतृत्वात मेळघाटातील कोटमी व टिटंबा या गावात क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आदिवासी संस्कृतीची रूढी व परंपरा जतन करण्यावर भर देण्यात आला, या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित असणे म्हणजेच आदिवासींची जागृती कडे वाटचाल असे समजून घेण्यास हरकत नाही, उपस्थित आदिवासी बांधवांच्या जनसमुदायाला संबोधित करताना अध्यक्ष मन्नालाल दारासिंबे यांनी सांगितले की, माझे आदिवासी बांधवानो अल्पशा दारू आणि मटण यासाठी आपल्या स्वाभिमान व अब्रू विकून अमूल्य मत चुकीच्या व्यक्तीला देऊ नका, मत विकणे मोठा गुन्हा असून विकासाला थांबवणे आहे.
संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्यांची वाचन करीत आज मी शिक्षित आहे म्हणून एवढा बोलतोय त्यामुळे आपण सर्व शिक्षित झालेत तर कोणाकडे मदतीची भीक मागण्याची आवश्यकता पडणार नाही, आमच्या अशिक्षितपणामुळे सर्रासपणे आदिवासींचे शोषण होत आहे हे सर्व थांबवायचे असल्यास शिक्षण महत्त्वाचे आहे. वन विभागाकडून आदिवासींची होणारी पिळवणूक लाजिरवाणी असून आपल्या आदिवासी बांधवांना कायदा आणि अधिकार याची जाणीव नाही त्यामुळे शोषणाचे बळी पडत आहे. याला आपण आदिवासी दोषी नाहीत तर ज्या लोकांना तुम्ही मतदान देऊन निवडून नेता बनवले त्यांचे दोष आहे त्यांनी कायदा तुमच्यापर्यंत पोहोचवले नाही अथवा त्यांना कायदे व अधिकार याची जाणीव नाही. आदिवासी बांधवांनो झेंडे आणि दंडयाच्या मोहात खुश होऊन नेत्याला मसीहा समजू नका, जनता मालक आहे, आपला विकास हवा असेल तर शिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
सत्ताधारी आमदार-खासदार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करीत मन्नालाल दारसिंबे म्हणालेत अनेक वर्षे सत्ता उपभोगून सुद्धा मूलभूत सुविधा न देणारे नेते तुमचे मसिहा होऊ शकत नाही. अभिनेते गोविंदा, सुनील शेट्टी यांना मेळघाटात आणणार्‍या खासदार आदिवासींच्या पुनर्वसनावर का बोलत नाही फक्त नौटंकी करणे हेच जर त्यांचे काम असेल तर त्यांची जागा आपल्या आदिवासी बांधवांनी दाखवून देणे गरजेचे आहे.
व्याघ्र प्रकल्प या विभागाने तुघलकी पद्धतीने आदिवासींचे पुनर्वसन करून त्यांचे छळ केले आहे, हे निंदनीय असून पुनर्वसनाचा मोबदला देण्यात भेदभाव केलेला आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे गर्भात असणाऱ्या बाळाची हत्या करणे गुन्हा असेल तर अठरा वर्षाच्या आतील मुलांना पुनर्वसनाचा मोबदला व्याघ्र प्रकल्प वन विभागाने का दिला नाही असा खडा सवाल करीत पुनर्वसनाच्या नावावर संविधानाचे उल्लंघन करीत आदिवासींचे शोषण होत असल्याचे सांगत ७५ वर्षांपासून मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ असणाऱ्या राजकीय नेत्याकडे मदत व विकासाची भीक मागणे लाचारी असून हि लाचारी झुगारण्याची वेळ आली आहे. आदिवासी बांधवानो डोळे उघडण्याची वेळ असल्याचे परखड मत मन्ना दारासिंबे यांनी मेळघाटात विविध ठिकाणी वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडले. मोठ्या संख्येने यावेळी महाराष्ट्र जन क्रांती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.