Home अमरावती मृत सभासद कल्याण निधी योजना शिक्षक कुटुंबियांच्या हितार्थ –गोकुल राऊत

मृत सभासद कल्याण निधी योजना शिक्षक कुटुंबियांच्या हितार्थ –गोकुल राऊत

743
0

योजना २ कोटी ३७ लाख रुपयाने सध्या तोट्यात
अमरावती,प्रजामंच विशेष,22/08/2021
अमरावती शिक्षक सहकारी बँक अमरावती कडून विमा योजनाच्या धर्तीवर चालविण्यात येणारी मृत सभासद कल्याण योजना सभासदाला अधिक लाभ मिळावे त्यादृष्टीने राबविण्याचा प्रयत्न असून २००८ च्या आमसभेत घेतलेल्या ठरावानुसार एकूण २४ अटी व शर्तीप्रमाणे सभासदांनी स्वत:ने स्वत: साठी सुरु केलेली हि योजना असून बँकच्या इतर व्यवहाराशी कोणताच संबध येत नसल्याची माहिती अध्यक्ष गोकुल राऊत यांनी सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्याना दिली, काही लोक यामध्ये संभ्रम निर्माण करून आपली राजकीय समीकरण जुळविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहे तो सभासदांच्या हिताच्या नसल्याची खंत व्यक्त केली.
२००३ पासून हि योजना सुरु झाली असली तरी २००८ मध्ये याला खर लाभाचे स्वरूप देवून हि योजना मृत सभासदाच्या कुटुंबियांना ३ लाख रुपये लाभ देण्याचा निर्णय झाला, पुढे ४ लाख नंतर १० लाख आणि नुकतेच सभासदांच्या मागणीमुळे हि योजना २० लाख रुपये लाभ देण्याचा निर्णय झाला आहे, कोरोना सारख्या महामारीमुळे मृत सभासदांची संख्या वाढल्याने सध्या स्थिती मृत सभासद कल्याण योजनेच्या निधीत २ कोटी ३७ लाख रुपायची तुट आल्याने हि योजना तोट्यात आली आहे, त्यामुळे योजना मागील अनेक वर्षापासून तोट्यात असल्याने व्याजाचा प्रश्नच निर्माण होत नाही.
सभासद संख्या
दि अमरावती शिक्षक सहकारी बँक अमरावती यामध्ये एकूण ९,०७८ सभासद असून हप्ता देण्यास पात्र असणाऱ्या सभासदांची संख्या ८१०१ एवढी आहे. मागील १९ वर्षात मृत सभासदांची संख्या ४४२ असून १८ कोटी ५४ लाख ६७ हजार ८ पन्नास रुपये मृत कल्याण योजनेव्दारे मृत सभासदांच्या कुटुंबियांना लाभ म्हणून देण्यात आले असून २ कोटी ३७ लाख रुपयाने सध्या योजना तोट्यात आहे. या योजनेत पूर्णपणे पारदर्शकता असून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नसल्याची माहिती अमरावती शिक्षक सहकारी बँकचे अध्यक्ष गोकुल राऊत यांनी दिली