Home अकोला अकोट येथे दशहतवाद विरोधी पथकाकडून ५ लाखाचा गुटखा जप्त

अकोट येथे दशहतवाद विरोधी पथकाकडून ५ लाखाचा गुटखा जप्त

374
0

अकोट प्रजामंच देवानंद खिरकर,११/०९/२०२१
दशहतवाद विरोधी पथकाला अकोट येथे मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती गुप्त खबरीच्या माध्यमातून मिळाली, त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर याच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाने अकोट शहरामध्ये हनुमान नगर परीसरात रवि तुकाराम नालट वय 44 वर्ष याचा घरी छापा मारून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये विमल गुटखा,सितार गुटखा,वाह गुटखा,नजर गुटखा,पांनबहार गुटखा,RMD मानिकचंद असा एकूण ५ लाख रूपयांचा मुद्देमाल सह आरोपी रवि तुकाराम नालट याच्या विरुद्ध पोलीस ठाणे अकोट शहर येथे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.